एखाद्याने समृद्धीकडे जाण्याचा विचार करणे हाच मुळात ‘परजीवी’ (Parasite) प्रवृत्तीचा विचार आहे?
परजीवी नक्की कोण आहे – किम कुटुंब, पार्क कुटुंब, मदतनीस व तिचा नवरा की समृद्धीची आशा? कारण त्या नशिबाच्या दगडामुळे परिस्थिती बदलण्याची एक आशा निर्माण होऊन पुढील सर्व गोष्टी घडत जातात; परिस्थिती बदलली आहे असा आभासही एका क्षणी निर्माण होतो, पण पुढच्याच क्षणी पुन्हा सगळे कोसळते. त्यामुळे या समाजव्यवस्थेत ‘आशा’च परजीवी ठरावी, अशी व्यवस्था असल्याचे जाणवते!.......